अट्टल चाेरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST2021-05-28T04:08:04+5:302021-05-28T04:08:04+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान (ता. पारशिवनी) येथे केलेल्या कारवाईत अट्टल चाेरट्यास अटक केली. ...

Attal Charta arrested | अट्टल चाेरटा अटकेत

अट्टल चाेरटा अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान (ता. पारशिवनी) येथे केलेल्या कारवाईत अट्टल चाेरट्यास अटक केली. त्याच्याकडून एकूण १४ हजार रुपये किमतीचा चाेरीचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. २७) सकाळी करण्यात आली.

विशाल मिलिंद नितनवरे (३०, रा. जवाहरनगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ११ हजार रुपये किमतीचे चार नळ चाेरीला गेल्याची तक्रार दीपक ढोबळे, रा. हनुमाननगर, कन्हान यांनी बुधवारी (दि. २६) रात्री कन्हान पाेलीस ठाण्यात दाखल केली हाेती. दरम्यान, याच काळात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान परिसरात गस्तीवर हाेते. त्यांनी ही चाेरी विशाल नितनवरे याने केल्याची माहिती मिळताच या पथकाने विशालला शिताफीने ताब्यात घेतले व चाैकशी केली.

त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक केली. शिवाय, त्याच्याकडून १४ हजार रुपये किमतीचे त्याने चाेरून नेलेले साहित्य जप्त केले. यात चार नग नळ व तीन नग कटरचा समावेश आहे. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी विशालविरुद्ध भादंवि ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, त्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काळे, शैलेश यादव, सत्यजित कटारे, प्रणय बनाफर, राहुल रंगारी, संदीप गेडाम, संजय बरोदिया, सुधीर चव्हाण यांच्या पथकाने केली.

===Photopath===

270521\img-20210527-wa0079.jpg

===Caption===

Photo : अटक करण्यात आलेल्या आरोपी सह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक

Web Title: Attal Charta arrested