महिलेच्या घरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:44+5:302021-03-09T04:09:44+5:30

नागपूर : क्षुल्लक कारणावरून एका महिलेच्या घरावर हल्ला चढवून आरोपींनी त्या महिलेला मारहाण केली. तिच्या दुचाकीचेही नुकसान केले. रविवारी ...

Attack on woman's house | महिलेच्या घरावर हल्ला

महिलेच्या घरावर हल्ला

नागपूर : क्षुल्लक कारणावरून एका महिलेच्या घरावर हल्ला चढवून आरोपींनी त्या महिलेला मारहाण केली. तिच्या दुचाकीचेही नुकसान केले. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास नंदनवनमध्ये ही घटना घडली. लता शिवशंकर अडकिने (वय २०) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

अडकिने नंदनवनमधील पडोळेनगरात राहतात. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास आरोपी संदीप अनिल काचोरे, डंबा ऊर्फ निखिल, करण कवडू रामटेके, अनुराग बोदले, प्रीत बोदले आणि त्याच्या दोन साथीदार अडकीने यांच्या घरावर चालून आले. तुम्ही शिलवंत सोनटक्केसोबत कशाला बोलता, आमचा त्याच्या सोबत वाद आहे, असे म्हणत आरोपींनी अडकिनेसोबत वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या दुचाकीला लाथ मारून दुचाकीचेही नुकसान केले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी तेथून निघून गेले. अडकीने यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

----

Web Title: Attack on woman's house