वीज वसुली पथकावर हल्ला, कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST2021-09-27T04:08:30+5:302021-09-27T04:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज वसुली करण्यासाठी गेलेल्या पथकावर ग्राहकाने हल्ला केला. लोखंडी रॉडने वार करून कर्मचाऱ्यास रक्तबंबाळ ...

Attack on power recovery squad, staff injured | वीज वसुली पथकावर हल्ला, कर्मचारी जखमी

वीज वसुली पथकावर हल्ला, कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज वसुली करण्यासाठी गेलेल्या पथकावर ग्राहकाने हल्ला केला. लोखंडी रॉडने वार करून कर्मचाऱ्यास रक्तबंबाळ केले. ही घटना रविवारी दुपारी जरीपटका येथे घडली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली.

कृष्णा अरुण वाठ यांच्या नावावर वीज मीटर आहे. त्यांच्यावर ५ हजार रुपयाची वीज थकबाकी होती. महावितरणतर्फे सध्या थकीत वीज वसुलीची मोहीम जोरात सुरु आहे. या मोहिमेंचर्गत थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन कापले जात आहेत. रविवारी सकाळी महावितरणचे पथक वसुलीसाठी वाठ यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी पथकासोबत वाद घातला. तसेच पथकावर हल्ला केला. यात वरिष्ठ तंत्रज्ञ सुखदेव केराम हे गंभीर जखमी झाले. ग्राहकाने लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्याने कर्मचारी रक्तबंबाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली.

- वीज कर्मचारी-अधिकारी संघटनेने केला घटनेचा निषेध, आज द्वारसभामहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सघंटनेचे नागपूर झोनल उपाध्यक्ष सहाय्यक-अभिंयता श्रीरंग मुत्तेपवार व विभागीय सचिव सुजित पाठक तसेच इतर पदाधिकारी यांना घटनेची माहिती होताच ते लगेच घटनास्थळी गेले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी १.३० वाजता विद्युत भवनासमोर द्वारसभा आयोजित करण्यात आली आहे. वसुली पथकाला संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

.

Web Title: Attack on power recovery squad, staff injured