शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवलदारावर प्राणघातक हल्ला : आरोपी निघाला पोलिसाचा मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 23:14 IST

पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. आरोपींमध्ये एक स्वप्निल युवराज सावरकर (वय २८, रा. मानकापूर) हा पोलीस हवालदाराचा मुलगा आहे.

ठळक मुद्देसात दिवसानंतर लागला छडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. आरोपींमध्ये एक स्वप्निल युवराज सावरकर (वय २८, रा. मानकापूर) हा पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. तर, दोघे सिक्युरिटी गार्ड आहेत. पोलीस लाईनमध्ये दिसलेल्या अनोळखी व्यक्तींना हटकले म्हणून त्यांनी पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदाराचे नाव अनिल चक्रे आहे. ते पोलीस मुख्यालयात सेवारत असून, सध्या रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात अतिदक्षता विभागात भरती आहेत. पोलीस लाईन टाकळीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.पोलीस लाईन टाकळीमध्ये राहणारे अनिल चक्रे हे २० सप्टेंबरला रात्री पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धनराज राठोड यांच्या घराजवळ बसून गप्पा करीत बसले. रात्री ८.३० च्या सुमारास चक्रे मेजर तेथून घराकडे जात असताना त्यांना दोन तरुण गप्पा करताना बसून दिसले. चक्रे मेजर यांनी त्यांना हटकले. तुम्ही कोण आहात, कशाला इकडे आले, अशी विचारणा केल्यामुळे आरोपींनी चक्रे मेजरसोबत वाद घातला. त्यांनी चक्रे मेजरच्या अंगावर स्प्लेंडर मोटरसायकल नेऊन त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील चक्रे मेजर यांना डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करून डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविले.पोलीस लाईनमध्ये पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली. हल्ला करणारे गुंड कोण असतील, असा प्रश्न निर्माण झाला होता. तर, पोलीस लाईनमध्ये येऊन पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांशी किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित असावा, असा संशय होता. या पार्श्वभूमीवर, चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला. खबऱ्याने हा हल्ला मानकापूर ठाण्यातील हवालदार युवराज सावरकर यांचा मुलगा स्वप्निल आणि त्याच्या साथीदाराने केल्याचे सांगितले. त्यावरून आज त्याला अटक करण्यात आली. संशयित साथीदाराची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक