पोलिसांवर हल्ला, जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST2021-04-02T04:08:37+5:302021-04-02T04:08:37+5:30

नागपूर : कळमना मार्केट परिसरात पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन आरोपींचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. ...

Attack on police, denied bail | पोलिसांवर हल्ला, जामीन नाकारला

पोलिसांवर हल्ला, जामीन नाकारला

नागपूर : कळमना मार्केट परिसरात पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन आरोपींचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. व्ही.बी. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.

समशेरसिंग मेजरसिंग रंधावा व मनदीपसिंग सूर्यवीरसिंग सिंधू अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना १७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली होती. गिरीश साहू या अल्पवयीन मुलाने ट्रकमधील खाद्यपदार्थ चोरल्यामुळे आरोपींनी त्याला ट्रकच्या डिझेल टँकला दोराने बांधले होते तसेच ते त्या मुलाला मारहाण करीत होते. दरम्यान, काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे काही पोलीस त्या मुलाला सोडवण्यासाठी तेथे पोहोचले असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला केला. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर जास्तीचे पोलीस बोलावून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे व इतर संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने ॲड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Attack on police, denied bail