मेडिकलमध्ये डॉक्टरवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:33+5:302021-09-23T04:09:33+5:30

................ मोलकरणीचे मंगळसूत्र पळविले नागपूर : मोलकरणीचे मंगळसूत्र पळविल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. अंजनाबाई बावणे (४७) रा. ...

Attack on doctor in medical | मेडिकलमध्ये डॉक्टरवर हल्ला

मेडिकलमध्ये डॉक्टरवर हल्ला

................

मोलकरणीचे मंगळसूत्र पळविले

नागपूर : मोलकरणीचे मंगळसूत्र पळविल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. अंजनाबाई बावणे (४७) रा. शास्त्रीनगर या मोलकरीण म्हणून काम करतात. त्यांना आंबेडकर मार्गावर दोन व्यक्तींनी थांबविले. त्यांनी अंजनाबाईंना ५० रुपयांच्या नोटांचे बंडल दाखविले. ते बंडल त्यांनी अंजनाबाईंच्या छत्रीत ठेवण्याचे नाटक केले. त्यानंतर ते त्यांना स्मॉल फॅक्ट्री एरियात घेऊन गेले. एक तास तेथे फिरविल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ९ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आपल्या साथीदाराला देऊन तेथून फरार झाले. त्यानंतर अंजनाबाईने छत्री उघडून पाहिली असता त्यांना फक्त एक ५० रुपयांची नोट दिसली. या नोटेसोबत रद्दी पेपर ठेवले होते. लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

.......

चौथ्या माळ्यावरून पडून पेंटरचा मृत्यू

नागपूर : चौथ्या माळ्यावरून पडून पेंटरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फुलचंद नागोसे (४५) हे मंगळवारी दुपारी सीताराम स्मृती बिल्डिंगच्या चौथ्या माळ्यावर पेंटिंगचे काम करीत होते. अचानक खाली पडून ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

.........

Web Title: Attack on doctor in medical