कॅफे हाऊसच्या संचालकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST2021-08-18T04:11:23+5:302021-08-18T04:11:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कॅफे हाऊस चालविणाऱ्या एका तरुणाला दोन आरोपींनी बेदम मारहाण केली. रविवारी सायंकाळी ४.५० च्या ...

Attack on the director of the cafe house | कॅफे हाऊसच्या संचालकावर हल्ला

कॅफे हाऊसच्या संचालकावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कॅफे हाऊस चालविणाऱ्या एका तरुणाला दोन आरोपींनी बेदम मारहाण केली. रविवारी सायंकाळी ४.५० च्या सुमारास बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

टोनी युजिन लुक्कत (वय ३२) आणि त्याचा भाऊ एरियस युजिन लुक्कत (वय ३०), अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे कृष्णनगरात राहतात. जरीपटक्यातील मार्टिननगरात राहणारा अडव्हर्ट अल्फ्रेड जॉन (वय २८) बजाजनगरात कॅफे हाऊस चालवतो. १५ ऑगस्टला सायंकाळी ४.५० च्या सुमारास अडव्हर्ट कॅफे हाऊसमध्ये बसून असताना आरोपी टोनी आणि एरियस तेथे आले. त्यांनी बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी अडव्हर्टला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी तेथून सटकले. दरम्यान, अडव्हर्टच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपी टोनी आणि एरियस या दोघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Attack on the director of the cafe house