जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:01+5:302021-02-08T04:08:01+5:30
सूरज उर्फ गोलू श्याम सरोटे (४०) रा. जाटतरोडी हा यात जखमी झाला आहे. आरोपीत दिनेश शिवप्रसाद राही (२९) रा. ...

जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारावर हल्ला
सूरज उर्फ गोलू श्याम सरोटे (४०) रा. जाटतरोडी हा यात जखमी झाला आहे. आरोपीत दिनेश शिवप्रसाद राही (२९) रा. विश्वकर्मानगर व आकाश लक्ष्मीनारायण चक्रवास (३०) जाटतरोडी यांचा समावेश आहे. गोलू सरोटे कुख्यात आरोपी आहे. नोव्हेंबर, २०२० मध्ये गोलूने दिनेशवर हल्ला केला होता. त्यानंतर, दोघात वाद सुरू होता. दिनेश विरुद्ध बलात्कार, तसेच आकाशवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी गोलूच्या नातेवाइकाचे लग्न होते. त्यावेळीही त्याचा आरोपींशी वाद झाला होता. शनिवारी रात्री ८.३० वाजता गोलू वंजारीनगरच्या दुकानावर दारू पित होता. तेथे आरोपी पोहोचले. त्यांचा गोलूशी वाद झाला. आरोपींनुसार गोलूने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चाकू हिसकावून गोलूवरच हल्ला केला. अजनी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
............