भ्रष्टाचारावर हल्लाबोल
By Admin | Updated: September 9, 2015 03:11 IST2015-09-09T03:11:34+5:302015-09-09T03:11:34+5:30
नागपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे, बंद असलेले पथदिवे, वस्त्यात साचलेला कचरा, ओसीडब्ल्यू कंपनीकडून होत असलेली ग्राहकांची लूट,

भ्रष्टाचारावर हल्लाबोल
काँग्रेसची मनपा कार्यालयावर धडक : ओसीडब्ल्यू, स्टारबस आॅपरेटर घोटाळ्यात कारवाई करा
नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे, बंद असलेले पथदिवे, वस्त्यात साचलेला कचरा, ओसीडब्ल्यू कंपनीकडून होत असलेली ग्राहकांची लूट, लाकूड घोटाळा व स्टार बस कंपनीचा अनागोंदी कारभार या संदर्भात महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी मनपातील विरोधी पक्षनेते व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यक र्त्यांनी मंगळवारी मनपा कार्यालयावर धडक दिली. जोरदार नारेबाजी करीत मनपाच्या गेटसमोर माठ फोडून रोष व्यक्त केला.
ओसीडब्ल्यू कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा पाणी बिल पाठवून ग्राहक ांची लूट चालविली आहे. वाढीव बिल न भरल्यास तीन दिवसान नळ कापण्याची नोटीस बजावली जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या कंपनीकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी सोपविल्यापासून शहरातील विविध भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. लेखा परीक्षणात कंपनीला मनपाने २६ कोटी जादा दिल्याचा ठपका ठेवला आहे. आंदोलकांनी कंपनीवर कारवाई करून पाण्याची देयके बदलून देण्याची मागणी प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे केली.
शहरातील प्रवासी वाहतूक सांभाळणाऱ्या वंश निमय कंपनीने केंद्र सरकारकडून मिळालेल्या २६० बसेसची देखभाल न केल्याने अनेक बसेस भंगारात निघाल्या. यामुळे राष्ट्रीय सपत्तीचे नुकसान झाले. कंपनीचा कंत्राट रद्द करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कंपनीला परिवहन महामंडळाचे आठ कोटी भरण्याचे निर्देश द्यावे. तसेच शहरातील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे. बंद पथदिवे सुरू करावे व शहरातील कचरा दररोज उचलला जावा, अशी मागणी केली.
आंदोलनात नगरसेवक दीपक कापसे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर,वासुदेव ढोके, अरुण डवरे, देवा उसरे, सुजाता कोंबाडे, रेखा बाराहाते, पंकज थोरात, सरस्वती सलामे, गजराज हटेवार, उमाकांत अग्निहोत्री, विजय बाभरे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)