शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

फितुरीमुळे ‘अ‍ॅट्रॉसिटीत’ शिक्षेचे प्रमाण कमी : राज्यमंत्री अविनाश महातेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 9:18 PM

दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अमलात आला आहे. परंतु यामध्ये शिक्षेचे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत आढावा घेतला असता असे लक्षात आले की, अनेकदा साक्षीदार आणि तक्रारकर्ताही फितूर होतो. दरम्यान सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका होते. तेव्हा अशा फितूरांनाच गुन्हेगार समजून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी कायदा करावा लागेल, याबाबत विचार केला जाईल, असे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देकारवाईसाठी कायदा होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अमलात आला आहे. परंतु यामध्ये शिक्षेचे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत आढावा घेतला असता असे लक्षात आले की, अनेकदा साक्षीदार आणि तक्रारकर्ताही फितूर होतो. दरम्यान सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका होते. तेव्हा अशा फितूरांनाच गुन्हेगार समजून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी कायदा करावा लागेल, याबाबत विचार केला जाईल, असे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. मंत्री झाल्यानंतर ते शुक्रवारी पहिल्यांदाच नागपूरला आले होते. रविभवन सभागृहात त्यांनी सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विविध योजनांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.राज्यमंत्री महातेकर म्हणाले, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची जलद गतीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान अनेकदा अव्यक्त बहिष्कार घातला जातो. या प्रकरणांमध्ये पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते. दोन समाजात वितुष्ट निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन प्रकरण सोडवण्याच्या सूचनाही आपण केल्या आहेत. विदर्भात दलित अत्याचाराच्या घटना इतर भागाच्या तुलनेत कमी असल्याचे ते म्हणाले. शिष्यवृत्तीबाबत विचारले असता शिष्यवृत्ती व फ्रीशिपमुळे कुणाचेही नुकसान होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अण्णाभाऊ साठे महामंडळ लवकरच पूर्ण गतीने सुरू होईल. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १०० कोटींची तरतूद सरकारने केली आहे. याअंतर्गत अनेक उपक्रम राबवून त्यांच्या वाङ्मयांचा प्रचार प्रसार करणार असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचा लाभ प्रामाणिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी समतादूताद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, नागपूर शहराध्यक्ष बाळू घरडे, राजू बहादुरे, सुधाकर तायडे, विनोद थूल, भीमराव मेश्राम, सतीश तांबे उपस्थित होते.दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणारदीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य सरकारने १०० कोटी देण्याचे जाहीर केले. ४० कोटींचा पहिला धनादेश दिला. परंतु, या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने तो खर्च होऊ शकत नाही. ही बाब आपल्याला आज समितीकडून सांगण्यात आली. मुंबईला पोहोचताच आपण मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन चर्चा करू. प्रशासकीय मान्यता तातडीने दिली जाईल, असे महातेकर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीवरील आरोप चुकीचेवंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटले जाते, याबाबत विचारले असता रिपाइं (आ)चे ज्येष्ठ नेते असलेले राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी हे आरोप खोडले. ते म्हणाले की, राजकारणात स्थिर व्हायचे असेल तर लहान पक्षाला निवडणूक लढवावी लागेल. तेव्हा कोण जिंकेल कोण हरेल हा प्रश्न गौण ठरतो. दोन मातब्बर पक्षाविरुद्ध लहान पक्ष निवडणूक लढत असेल तर लहान पक्षावर असे आरोप होत असतात. त्यामुळे वंचितलाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.विधानसभेत १२ ते १५ जागा लढणारआगामी विधानसभा निवडणुकीतही रिपाइ (आ) भाजप-सेनेसोबतच राहील. भाजपकडून रिपाइं (आ)ला १२ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातूनही आम्हाला जागा मिळायला पाहिजे, असेही महातेकर यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाministerमंत्री