लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:11 IST2021-02-26T04:11:40+5:302021-02-26T04:11:40+5:30

हिंगणा : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने तरुणीवर अत्याचार केला. दरम्यान, आराेपीने लग्नास नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने गुरुवारी (दि. २५) ...

Atrocities on young women by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

हिंगणा : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने तरुणीवर अत्याचार केला. दरम्यान, आराेपीने लग्नास नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने गुरुवारी (दि. २५) पाेलीस ठाणे गाठत तक्रार नाेंदविली.

मयूर उमेश मसकर (२२, रा. कान्हाेलीबारा, ता. हिंगणा) असे आराेपीचे नाव असून, ताे हिंगणा येथे एका औषधीच्या दुकानात कामाला हाेता. तर पीडित तरुणी तालुक्यातील बिबी (सावळी) येथे राहते. ती हिंगणा येथे काॅलेजमध्ये यायची. दरम्यान, आराेपीशी तिची ओळख झाली. दाेघांचेही प्रेमसंबंध जुळले. अशात आराेपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून १४ नाेव्हेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ दरम्यान तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने लग्न करण्याची मागणी केली असता, आराेपी टाळाटाळ करू लागला. त्यामुळे गुरुवारी पीडितेने हिंगणा पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी भादंवि कलम ३७६, २ एन ३१२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. ठाणेदार सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक अमृता साेमवंशी करीत आहेत.

Web Title: Atrocities on young women by showing the lure of marriage