लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:23 IST2021-02-20T04:23:24+5:302021-02-20T04:23:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ३० वर्षीय तरुणाने २९ वर्षीय तरुणीशी जवळीक निर्माण करीत, तिला लग्न ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ३० वर्षीय तरुणाने २९ वर्षीय तरुणीशी जवळीक निर्माण करीत, तिला लग्न करण्याची बतावणी केली आणि तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाचा तगादा लावताच, त्याने लग्न करण्यास नकार देत, तिच्या अश्लील चित्रफीत साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच घडला असून, पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.
सनी दिलीप धानाेरे (३०, रा.मनसर, ता.रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. सनीने जीवन साथी या लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून २९ वर्षीय तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्याशी जवळीक साधली. त्याने माेबाइल क्रमांक मिळवून तिला लग्न करण्याची बतावणी केली. एवढेच नव्हे, तर त्याने तिला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला घरीही बाेलावले. त्यानंतर, त्याने तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.
पुढे तिने त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. हा प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगण्याची तिने सूचना करताच, त्याने अश्लील चित्रफीत साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही देत, त्याने तिच्यावर वावरंवार अत्याचार केला. शेवटी तिने पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ३७६ (२) (एन), ४१७, ५०४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर करीत आहेत.
....
जीवे मारण्याची धमकी
पीडित तरुणीने हा प्रकार सनीच्या कुटुंबीयांसमाेर उघड करीत त्याला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर सनीने तिला मारहाण केली आणि जीवे तारण्याची धमकीही दिली. एवढेच नव्हे, तर तिच्याकडील माेबाइल हिसकावून घेत, तिला नागपूर शहरातील हुडकेश्वर भागात साेडून दिले. त्यानंतर, तिने रामटेक पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली.