अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST2021-09-02T04:19:19+5:302021-09-02T04:19:19+5:30

रामटेक : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरी येथे मंगळवारी ...

Atrocities on a minor girl, RAP arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपी अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपी अटकेत

रामटेक : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरी येथे मंगळवारी (दि.३१) उघडकीस आली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.

राेशन गणेश धुर्वे (१८, रा. बाेरी, ता. रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने १६ वर्षीय मुलीला १३ ते ३१ ऑगस्टदरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी नेले. त्यानंतर आराेपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यासाेबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब लक्षात येताच पीडितेच्या वडिलांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(एन), सहकलम ४, ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहायक पाेलीस निरीक्षक एन. जी. भुते करीत आहेत.

Web Title: Atrocities on a minor girl, RAP arrested