चिमुकलीवर अत्याचार

By Admin | Updated: July 12, 2014 02:20 IST2014-07-12T02:20:28+5:302014-07-12T02:20:28+5:30

चार वर्षांच्या एका चिमुकलीसह दोघींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे इमामवाडा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.

Atrocities on the Chimukulla | चिमुकलीवर अत्याचार

चिमुकलीवर अत्याचार

योगेश पांडे नागपूर
मुस्लीम धर्मात महिलांच्या बुरख्याला (हिजाब) एक महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक भावनेशी जुळलेला बुरखा घालून येण्यास राज्यातील काही महाविद्यालयांनी बंदी घातल्याचे समोर आले होते. ही बाब राज्य शासनाने गंभीरतेने घेतली आहे. शाळा व महाविद्यालयांच्या आवारामध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालून येण्यास बंदी घालणे अयोग्य आहे व अशा प्रकारचे आदेश महाविद्यालयांनी देऊ नये अशा आशयाचे परिपत्रक ‘डीटीई’ने (डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन)े काढले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशांनंतर संबंधित परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा कालावधीत मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालण्याबाबत बंदी घालण्यात आल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्येदेखील असे प्रकार सुरू असल्याची तक्रार ‘मुव्हमेन्ट फॉर ह्युमन वेल्फेअर’ या संस्थेने केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने संबंधित महाविद्यालयांना चांगलेच फटकारले. भविष्यात अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत यासंदर्भात विभागाने विस्तृत निर्देशच काढले आहेत.
मुंबईतील काही महाविद्यालयांमध्ये झालेल्या घटनांमुळे सामाजिक समतोल बिघडण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही धर्माशी संबंधित असलेले संवेदनशील आदेश काढताना महाविद्यालयांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आले. या निर्देशांच्या आधारावर यासंबंधात ‘डीटीई’ने सर्व पदवी, पदविका महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी परिपत्रक काढले आहे.

Web Title: Atrocities on the Chimukulla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.