चिमुकलीवर अत्याचार
By Admin | Updated: June 18, 2014 01:30 IST2014-06-18T01:30:15+5:302014-06-18T01:30:15+5:30
हुडकेश्वरमध्ये एका इसमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोमवारी रात्री पिपळा परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने आरोपीची बेदम धुलाई केली.

चिमुकलीवर अत्याचार
आरोपीची धुलाई : हुडकेश्वरमध्ये तणाव
नागपूर : हुडकेश्वरमध्ये एका इसमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोमवारी रात्री पिपळा परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने आरोपीची बेदम धुलाई केली. नंतर पोलिसांनी अटक केली आहे.
तुषार प्रकाश मिस्कीन (वय २४) हा पिपळा गावात राहातो. याच भागातील एका आठ वर्षांच्या मुस्कानला (बदललेले नाव) चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने सोमवारी रात्री ७ च्या सुमारास हुडकेश्वरातील शाळेच्या मागे नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कुणाला सांगितली तर जीवे मारीन, अशी धमकीही दिली. दरम्यान, पाऊण तासापासून मुलगी दिसत नसल्याने तिच्या आईने शोधाशोध केली. ती नजरेस पडताच तिची अवस्था पाहून आईच्या काळजात धस्स झाले. आईने मुस्कानला विचारले असता तिने तुषार मिस्कीनच्या पापाची वाच्यता केली. या घटनेमुळे हुडकेश्वरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनी तुषारची बेदम धुलाई केली. मुस्कानच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी कलम ३७६ (२, आय, ए) ५०६ भादंवि तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ३,४,५ (एम), ७,८,९,१० अन्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)