मतिमंद मुलीसह दोघींवर अत्याचार
By Admin | Updated: January 15, 2017 02:10 IST2017-01-15T02:10:49+5:302017-01-15T02:10:49+5:30
शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका मतिमंद मुलीसह दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

मतिमंद मुलीसह दोघींवर अत्याचार
नागपूर : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका मतिमंद मुलीसह दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील १२ वर्षीय मुलगी मतिमंद असल्याचे सांगितले जाते.
पहिली घटना इमामवाडा परिसरात घडली. पीडित १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आशिष लोणारे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आशिष सक्करदरा बाजरात भाजी विक्रीचे दुकान लावतो. मुलीच्या वस्तीत फिरत असताना त्याला अनेकदा ही मुलगी दिसून आली. ती त्याला पाहून हसायची. त्यामुळे त्याने तिच्याशी भेटणे सुरू केले. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बाईकवर नेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. मुलगी मतिमंद असल्याने कुणाला काही माहीत होणार नाही, याची त्याला खात्री होती. परंतु शुक्रवारी मुलीच्या आईला तिच्यावर संशय आला. तिला विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर इमामवाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शनिवारी आरोपीला न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
दुसरी घटना जरीपटका परिसरात घडली. नवव्या वर्गातील १५ वर्षीय विद्यार्थिनी सायंकाळी दयानंद पार्क येथे फिरायला येत असे. तिथे आरोपी दीपक पाटील रा. मिसाळ ले-आऊट हा सुद्धा आपल्या परिचित महिला सोनीसोबत फिरायला येत होता. यादरम्यान पीडित विद्यार्थिनीची त्याच्याशी ओळख झाली.
गुरुवारी सकाळी ११ वाजता आरोपी दीपक व त्याची साथीदार सोनीसोबत पीडित विद्यार्थिनी एका अज्ञातस्थळी गेली. तिथे आरोपीने तिच्याशी बळजबरीने अत्याचार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली. साथीदार महिला फरार आहे. (प्रतिनिधी)