नायब तहसीलदार असल्याचे सांगून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:02 PM2021-03-24T23:02:38+5:302021-03-24T23:04:01+5:30

Sexual exploitation, crime news स्वत:ला नायब तहसीलदार असल्याचे सांगून बालपणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समाेर आले आहे.

Atrocities of being a Nayab tehsildar | नायब तहसीलदार असल्याचे सांगून अत्याचार

नायब तहसीलदार असल्याचे सांगून अत्याचार

Next
ठळक मुद्देसरकारी कर्मचारी ठरली बळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : स्वत:ला नायब तहसीलदार असल्याचे सांगून बालपणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. कपिलनगर पाेलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आराेपीचे नाव पारिताेष दीपक डांगे (३०) असून ताे रेवतीनगर, बेसा येथील रहिवासी आहे. पीडित महिला केंद्र शासनाच्या विभागात लिपिक म्हणून सेवारत असून तिचा घटस्फाेट झाला आहे. आराेपी पारिताेष तिचा बालपणीचा मित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने ऑगस्ट २०२० मध्ये फेसबुकवर महिलेशी पुन्हा मैत्री जाेडली. आपण नायब तहसीलदार असल्याचे त्याने सांगितले. स्वत: अविवाहित असल्याचे सांगून पीडितेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. ताे महिलेच्या घरीच राहू लागला. यादरम्यान मारहाण करून शारीरिक संबंध स्थापित केले. महिलेने पाेलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर जानेवारी महिन्यात बनावट लग्नही केले आणि पुन्हा संबंध बनविले. त्यानंतर मात्र ताे गायब झाला. पीडित महिलेने कपिलनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपी डांगेविराेधात बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्याने केंद्र सरकारी कार्यालयात कार्यरत आणखी एका महिलेचे शाेषण केल्याची बाब समाेर आली आहे. मात्र बदनामीच्या भीतीने महिला तक्रार नाेंदविण्यास तयार नव्हती.

Web Title: Atrocities of being a Nayab tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.