माजी बास्केटबॉलपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता सज्जन सिंह चीमा हे शेतकरी आंदोलनाला खेळाडूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. चीमा हे पंजाबमधील आपल्या सहकारी खेळाडूंच्या संपर्कात असून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्व खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार राष्ट्रपतींकडे परत करावेत असे पटवून देत आहेत. ३० हून अधिक माजी ऑलिम्पिक तसेच इतर मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून पदके मिळवणाऱ्या खेळाडूंनी पाठिंबा दिला. त्यात गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांचाही समावेश आहे. हे दोघेही १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचे सदस्य होते. हे खेळाडू ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवून येणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा पदके परत करण्याची खेळाडूंची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST