अट्टल चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:44+5:302021-07-18T04:07:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : अर्जुन भुनेश्वर साव, रा. खापरखेडा, ता. सावनेर यांच्या घरातून साेन्याचांदीचे दागिने आणि राेख रक्कम ...

अट्टल चाेरटे अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : अर्जुन भुनेश्वर साव, रा. खापरखेडा, ता. सावनेर यांच्या घरातून साेन्याचांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेणाऱ्या दाेन चाेरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री खापरखेडा परिसरातून अटक केली. त्यांनी अर्जुन साव यांच्या घरी रविवारी (दि. ११) मध्यरात्री चाेरी केली हाेती.
गाेपाल दुजेराम देवांगण (३१, रा. जारव्हाय, जिल्हा दुर्ग, छत्तीसगड) व राेहित ऊर्फ राजा हिवराज गेडाम (२१, रा. जमनापूर, ता. साकाेली, जिल्हा भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. अर्जुन साव यांच्या घरी कुणीही नसताना चाेरी झाल्याने खापरखेडा पाेलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली हाेती. शिवाय, स्थानिक गुन्हे शाखेनेही या घटनेचा समांतर तपास करायला सुरुवात केली हाेती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापरखेडा परिसरात गस्तीवर असताना त्यांना दाेघेही संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले. पाेलिसांना पाहताच एकाने हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चाैकशीअंती दाेघांनीही अर्जुन साव यांच्या घरी चाेरी केल्याचे कबूल करताच त्यांना अटक करून खापरखेडा पाेलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, साहेबराव बहाळे, हवालदार विनाेद काळे, महेश जाधव, वरेंद्र नरड, राजेश सनाेडिया, भाऊराव खंडाते, राजू रेवतकर, अरविंद भगत, शैलेश यादव, सत्यशील काेठारे, प्रणय बनाफर, अजिज दुधकनाेज यांच्या पथकाने केली.
...
छत्तीसगडमध्येही घरफाेडी, वाहनचाेरी
गाेपाल देवांगण हा मूळचा छत्तीसगडमधील रहिवासी असला तरी ताे काही वर्षापासून खापरखेडा येथे राहताे. ताे नेहमीच त्याच्या मूळ गावी जायचा. त्यामुळे त्याने व राेहितने गुडियारी, जिल्हा रायपूर (छत्तीसगड) तसेच महाराष्ट्रातील भंडारा, नागपूर जिल्ह्यातील सावनेर व काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घरफाेडी व वाहनचाेरी केल्या आहेत. त्यांच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी वर्तवली.