शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रवियोगाने न खचता 53 व्या वर्षी ती पुन्हा बनली आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:05 IST

मंदाकिनी विनोद मानके असे त्या आईचे नाव. एकुलता एक मुलगा अक्षयला कोरोना झाला. १५ एप्रिल २०२१ रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यातही त्या खचल्या नाहीत. 

सुमेध वाघमारे -

नागपूर: कोरोनामुळे त्या माउलीने २७ वर्षीय मुलगा गमावला. परंतु दु:खाने खचून न जाता एक दिवस जिद्दीने ती उठली. थेट हॉस्पिटल गाठले. ‘मला पुन्हा मूल हवंय...’ असे सांगत डॉक्टरांचे पायच धरले. तिची इच्छाशक्ती पाहून डॉक्टरांनी उपचार सुरु केले आणि ५३ व्या वर्षी ती पुन्हा आई बनली. मुलाचा मृत्यू झाला, त्याच्या एक दिवस आधी, १४ एप्रिल रोजी तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मंदाकिनी विनोद मानके असे त्या आईचे नाव. एकुलता एक मुलगा अक्षयला कोरोना झाला. १५ एप्रिल २०२१ रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यातही त्या खचल्या नाहीत. वंध्यत्व आणि आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. संगीता ताजपुरिया यांच्याकडे गेल्या. मला पुन्हा आई व्हायचे आहे, असे सांगत कोणत्याही वैद्यकीय उपचाराला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. अडीच वर्षांपूर्वीच रजोनिवृत्ती झाली होती. पती विनोद एक निवृत्त शिक्षक. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह आहे. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता नव्हती. डॉ. ताजपुरिया यांनी उपचार  सुरु केले. जुलैमध्ये डॉक्टरांनी  यशस्वीपणे  ‘आयव्हीएफ’ केले. 

७७ वर्षीय आईलाही आनंद : मंदाकिनी यांच्या ७७ वर्षीय आईला मुलगी पुन्हा आई होणार हे लक्षात आल्यावर त्यांनी पहिल्या बाळंतपणासाठी जेवढे कष्ट घेतले नसतील त्याच्या दुप्पट कष्ट आपल्या मुलीसाठी घेतले. 

इच्छाशक्तीमुळेच शक्य झाले-  ‘लोकमत’शी बोलताना डॉ. ताजपुरिया म्हणाल्या, मंदाकिनी आरोग्य दृष्टीने फिट असल्याने औषधाने मासिक पाळी सुरू केली.  प्रसूतीचा दिवस २५ एप्रिल २०२२ होता; परंतु त्यांनीच प्रसूतीची तारीख ठरवून ठेवली होती. २५ मार्च रोजी तपासणी केली असता गर्भातील पाणी कमी झाले होते. -  सोबतच नाळ बाळाच्या गळ्याभोवती आल्याचे दिसले. फोनवरून संवाद साधत होते. आठवड्यातून एकदा रुग्णालयात बोलावून तपासत होते. -  १३ एप्रिल २०२२ रोजी त्या रुग्णालयात आल्या. १४ एप्रिल रोजी सिझर झाले. इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांमुळेच त्या पुन्हा आई होऊ शकल्या. 

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला