शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संकुचित विचारसरणीमुळे ज्योतिषशास्त्राला कमीपणा आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:55 IST

ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्योतिषशास्त्र हे अभ्यासाचे शास्त्र आहे. परंतु अनेकांना या शास्त्राचे महत्त्व व स्वरुपच कळालेले नाही. नोकरी, लग्न, अपत्यप्राप्ती याच गोष्टीसाठी लोक याचा उपयोग करताना दिसून येतात. ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीच्या प्रथम प्रचारिका सिंधुताई फाटक यांच्या स्मरणार्थ संघमित्रा प्रतिष्ठानतर्फे सिंधू सन्मान प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.धंतोली येथील अहल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, संघमित्रा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रिया काळे या उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात लक्षणीय प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना सिंधू सन्मान प्रदान करण्यात येतो. बेकरीच्या व्यवसायातून स्वत:ची ओळख निर्माण करणाºया नाशिकच्या ८४ वर्षीय गंगुताई धामणकर, नागपूरच्या पंचांग अभ्यासिका विद्याताई राजंदेकर, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात करोडपती बनणाºया पहिल्या महिला बबिता ताडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आजकालचे पुरस्कार चंगळवादाकडे झुकलेले दिसून येतात. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करताना खरोखर समाधान देणारे पुरस्कार फार थोडके राहिले आहेत. ज्योतिषशास्त्र हे योग्य पद्धतीने अभ्यासायचे शास्त्र आहे. ते कळले नाही म्हणून टीका करणे योग्य नाही. एखाद्याने हे शास्त्र शिकले तर आता त्याचे नवीन दुकान सुरू होईल, अशी भाषा वापरली जाते. या शास्त्राचे महत्त्व कळाले नसल्यानेच अशा प्रतिक्रिया येतात, असे डॉ.उमा वैद्य म्हणाल्या. यावेळी तिन्ही पुरस्कार विजेत्यांच्या प्रकट मुलाखतीदेखील घेण्यात आल्या. मेधा नांदेडकर, सीमा देशपांडे, आदिती देशमुख यांनी या मुलाखती घेतल्या. आयुष्यात अनेक संकट आली. परंतु साखर नाही म्हणून गूळ वापरण्यासारखा प्रकार आम्ही कधीच केला नाही, असे प्रतिपादन गंगुताई धामणकर यांनी केले. पंचांग हे कुणीही अभ्यासू शकते. कुठलेही काम करण्याची शुभ वेळ हे थोतांड नसून त्यामागे शास्त्र असल्याचे मत विद्या राजंदेकर यांनी व्यक्त केले. निराश झाल्यावर परिस्थितीला दोष न देता त्यावर मात करण्यासाठी जिद्द दाखविली पाहिजे, असे आवाहन बबिता ताडे यांनी केले.

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषnagpurनागपूर