शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

समाज आणि देशाचे संकट निवारण्याचा ज्योतिषशास्त्राचा प्रयत्न असावा; आमदार मेधा कुळकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:52 IST

ज्योतिषशास्त्र आधुनिकतेचा टच देण्याबरोबरच समाज आणि देशाला चांगले देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार मेधा कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतनागपूर : ज्योतिषशास्त्र हे पूर्वापार चालत आलेले शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राची वेगळीच ताकद आहे. ते टाकाऊ नाही. अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने या शास्त्राला सामाजिक आयाम देता येऊ शकतो का? या दृष्टीने अभ्यास झाल्यास काळाच्या ओघात हे शास्त्र टिकून राहील. शास्त्राला आधुनिकतेचा टच देण्याबरोबरच समाज आणि देशाला चांगले देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार मेधा कुळकर्णी यांनी व्यक्त केले.बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणेतर्फे नागपुरात २३ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन प्रतिभा शाहू मोडक यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले आहे. चार दिवसीय हे संमेलन कुसुमताई वानखेडे भवन येथे सुरू आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मेधा कुळकर्णी यांच्याहस्ते झाले. यावेळी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आमदार सुनील केदार, नगरसेविका रूपा राय, सभापती संजय बंगाले, वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती नंदकिशोर जिचकार उपस्थित होते. यावेळी वि.वा. दिवेकर यांना जीवनगौरव, प्रतिभा शाहू मोडक यांना सहस्रदर्शन गौरव व विजय देशपांडे यांना अमृत महोत्सव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या की, मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्या पिढीला ज्योतिषशास्त्र मानसिक, शारीरिक व आत्मिक शांती देऊ शकते. त्यासाठी ज्योतिष आणि आध्यात्मिकतेची सांगड घालता आली पाहिजे. समाज जसा बदलतो तसे ज्योतिषशास्त्र बदलले पाहिजे असे मत रूपा रॉय यांनी व्यक्त केले. ज्योतिषशास्त्राला विज्ञानाची जोड दिल्यास आणि अनुभव व अभ्यास याची सांगड घातल्यास यातून चांगला मार्ग निघत असल्याचे प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या. अधिवेशनच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. मालती शर्मा यांनी केले. आभारप्रदर्शन ओमप्रकाश परियाल यांनी केले. अधिवेशनानिमित्ताने ज्योतिष प्रदर्शनाचे आयोजनसुद्धा येथे करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७