लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांसह इतरही बांधकामांमुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत. तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्येही अस्थमा वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे सामोर आले आहे.जगात मे महिन्याचा पहिला मंगळवार हा अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी भारतात बालकांमध्ये अस्थमाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका खासगी संस्थेने २००३मध्ये लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण २.५ टक्के होते. २००८ मध्ये हेच प्रमाण ५.५ टक्क्यांवर आले. तर २०१४मधील पाहणीनुसार हे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आल्याचे निदर्शनास आले आहे.१० ते १५ टक्के मुले अस्थमाच्या विळख्यात-डॉ. अरबटशहरी भागातील प्रदूषणामुळे मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढत आहे. याला अनेक कारणे असली तरी हवेचे प्रदूषण, धूळ, खाण्याच्या बदललेल्या सवयी, पाळीव प्राण्यांचे केस व त्यातील किडे घातक ठरतात. शहरातील लोकसंख्येचा विचार करता, ५ ते ११ वयोगटातील १० ते १५ टक्के मुले अस्थमाच्या विळख्यात अडकत असल्याची माहिती प्रसिद्ध छाती रोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:26 IST
शहरात मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांसह इतरही बांधकामांमुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत. तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्येही अस्थमा वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे सामोर आले आहे.
भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा
ठळक मुद्देउपराजधानीत वाढतोय आजार : हवेतील प्रदूषण, शहरातील वाढते बांधकाम ठरतेय कारणआज जागतिक अस्थमा दिन