फ्लार्इंग क्लबच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन
By Admin | Updated: July 9, 2015 02:54 IST2015-07-09T02:54:43+5:302015-07-09T02:54:43+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर फ्लॉर्इंग क्लबचा ६ महिन्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले

फ्लार्इंग क्लबच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन
देवेंद्र फडणवीस : हायकोर्टात याचिकाकर्त्याची माहिती
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर फ्लॉर्इंग क्लबचा ६ महिन्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले असून त्यानुसार काही महत्त्वाची विकासकामेही सुरू झाली आहेत, अशी माहिती संबंधित याचिकाकर्त्यातर्फे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. यासंदर्भात वायुसेनेचे निवृत्त फायटर पायलट श्रीधर घटाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही घडामोड लक्षात घेता प्रकरणावर ६ महिन्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. न्यायालयात सादर माहितीनुसार, घटाटे व त्यांचे वकील श्रीनिवास देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन नागपूर फ्लॉर्इंग क्लबच्या दुरावस्थेची माहिती दिली होती. हा क्लब देशात सर्वोत्कृष्ट आहे. यामुळे क्लबचा विकास करणे आवश्यक आहे. क्लबमधील विमाने जुनी झाली आहे. नवीन मल्टी इंजिन व अतिरिक्त विमाने देण्याची गरज आहे. याशिवाय कुशल प्रशिक्षक, धावपट्टीची दुरुस्ती यासारख्या अनेक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)