अध्यक्ष मानकर, उपाध्यक्ष डोनेकर?

By Admin | Updated: September 21, 2014 01:16 IST2014-09-21T01:16:02+5:302014-09-21T01:16:02+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अरु णा मानकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड के ली जाणार आहे. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे शनिवारी सकाळी पार पडलेल्या शिवसेना-भाजप

Assuming President, Vice President Donaker? | अध्यक्ष मानकर, उपाध्यक्ष डोनेकर?

अध्यक्ष मानकर, उपाध्यक्ष डोनेकर?

जिल्हा परिषद : शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठकीत निर्णय
नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अरु णा मानकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड के ली जाणार आहे. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे शनिवारी सकाळी पार पडलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऐनवेळी काही चमत्कार घडला तरच यात बदल शक्य आहे. अन्यथा यात बदलाची शक्यता नसल्याची माहिती युतीच्या नेत्यांनी दिली.
शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख दीपक सावंत, आमदार आशीष जयस्वाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार,आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मोजकेच नेते या बैठकीला उपस्थित होते. मागील काही दिवसात अध्यक्षपदासाठी निशा सावरकर व शुभांगी गायधने यांच्या तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या भारती गोडबोले यांच्या नावाची चर्चा होती. परंतु गेल्या निवडणुकीत सावरकर व गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतल्याने त्यांच्या नावाला दोन्ही पक्षाच्या नेत्यांची विरोध दर्शविला. त्यामुळे मानकर व डोनेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जि.प.मध्ये भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी अशी आघाडी आहे. परंतु शिवसेना-भाजपकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जुळल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून शिवसेना -भाजप युतीची सत्ता गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बंदोबस्तात सभा
अध्यक्ष, उपाधाक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान गोंधळ, दबावाचे राजकारण होऊ नये यासाठी जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृह परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी, सदस्य व सभापती उपस्थित राहतील. मात्र सभापतींना मतदान करता येणार नाही. इतरांना प्रवेश राहणार नाही.

Web Title: Assuming President, Vice President Donaker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.