शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३०,२१० शेतकऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:00 IST

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १३ कोटी ३६ लाख रुपये मदत निधीचे ९९ टक्के वाटप करण्यात आले आहे, एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ठळक मुद्दे९९.५४ टक्के मदतनिधी वाटपकामठी मागेच, मौदा, काटोल, रामटेक, पारशिवनी, कळमेश्वर १०० टक्के वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १३ कोटी ३६ लाख रुपये मदत निधीचे ९९ टक्के वाटप करण्यात आले आहे, एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने मदतीसाठी हेक्टरी ८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले तर फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानासाठी ४६ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविण्यात आला. राज्यशासनाने पहिल्या टप्प्यात १३ कोटी ३६ लाखाचा निधी दिला. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केल्यावर दुसऱ्या टप्प्यातील निधी शासनाकडून मिळणार आहे. १४ नोव्हेंबरला हा निधी मिळाला. २८ तारखेपर्यंत ९९.५४ टक्के वाटप झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मौदा, काटोल, रामटेक, पारशिवनी, कळमेश्वर तालुक्यात १०० टक्के वाटप झाले. या मदत वाटपात कामठी तालुका मात्र मागेच आहे. कामठी तालुक्यात आतापर्यंत ८२.९३ टक्के रकमेचे वाटप करण्यात आले.एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना ही मदत मिळाली असून यामध्ये सर्वाधिक ८८४३ शेतकरी नरखेड व ८१५२ शेतकरी हे काटोल तालुक्यातील आहेत. त्यानंतर कळमेश्वर ५३५७, सावनेर ४५४१ आणि मौदा तालुक्यातील १६८८ शेतकºयांचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार