बीएपीएस स्वामिनारायण संस्थेद्वारे अडीच लाख गरजूंना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:25 AM2020-04-22T00:25:13+5:302020-04-22T00:26:57+5:30

कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये लाखोच्या संख्येतील गरजूंपर्यंत बीएपीएस स्वामिनारायण संस्था पोहोचली आहे. नागपुरात या संस्थेकडून आतापर्यंत अडीच लाख लोकांना मदत पुरविण्यात आली असून, देशभरात ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे.

Assistance to 2.5 lakh needy people through BAPS Swaminarayan Sanstha | बीएपीएस स्वामिनारायण संस्थेद्वारे अडीच लाख गरजूंना मदत

बीएपीएस स्वामिनारायण संस्थेद्वारे अडीच लाख गरजूंना मदत

googlenewsNext
ठळक मुद्देदेशभरात ४७ लाख लाभार्थ्यांची केली सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये लाखोच्या संख्येतील गरजूंपर्यंत बीएपीएस स्वामिनारायण संस्था पोहोचली आहे. नागपुरात या संस्थेकडून आतापर्यंत अडीच लाख लोकांना मदत पुरविण्यात आली असून, देशभरात ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे.
नागपुरात २० मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. तेव्हापासून वाठोडा, रिंगरोड येथे असलेल्या स्वामिनारायण मंदिर संस्थेद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगर पालिका, पोलीस विभाग व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत स्वामिनारायण संस्था जिल्ह्यातील अडीच लाख गरजूंपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत संस्थेतर्फे दोन हजार रेशन किट्सचे वाटप करण्यात आले असून, ६५०० कप चहा, ३८०० पाऊच दही, दीड हजार पाऊच दूध, २००० ‘क्वारंटाइन’ व्यक्तींकरिता भोजन, ४० हजारावर पोळ्या आणि १४ हजार लोकांना खिचडीचे वाटप करण्यात आल्याची माहिती स्वामी मुनिदर्शन यांनी दिली. शिवाय, चिकित्सा क्षेत्रातही संस्थेचे डॉक्टर व स्वयंसेवक कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे देशभरात सेवाकार्य राबविले जात असून, त्याअंतर्गत आतापर्यंत ४७ लाख ८३ हजार गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे. शिवाय, ३० हजाराच्या वर मास्क आणि पाच हजाराच्या वर सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतरही गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचे सेवाकार्य बीएपीएस स्वामिनारायण संस्थेतर्फे केले जाणार असून प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी पर्वानिमित्त त्यांना ही सेवा अर्पण केली जात असल्याचे स्वामी मुनीदर्शन यांनी सांगितले.

Web Title: Assistance to 2.5 lakh needy people through BAPS Swaminarayan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.