शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला : जुन्या वैमनस्याचे पर्यवसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:23 IST

तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कळमन्यातील एका वाहतूक व्यावसायिकाचा मुलगा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देनंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कळमन्यातील एका वाहतूक व्यावसायिकाचा मुलगा गंभीर जखमी झाला. शिवम महेश जयस्वाल (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वाठोडा मार्गावरील उमिया कॉलनीत शिवम राहतो. त्याचे वडील ट्रान्सपोर्टर आहेत. शिवमसोबत त्याच भागात राहणाऱ्या पुलकित खोब्रागडेचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. काही दिवसांपूर्वी शिवमने पुलकितच्या भावाला बेदम मारहाण केली होती. तेव्हापासून या वादात भर पडली. त्यानंतर त्यांचे एकमेकांना धमकावणे, मारहाण करणे, असे प्रकार सुरू झाले.या पार्श्वभूमीवर, शिवम रविवारी दुपारी ३ च्या सुमारास त्याच्या बुलेटने परिसरातून जात होता. ते पाहून आरोपी पुलकित, अमन कारेमोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याला आवाज दिला. धोका लक्षात आल्यामुळे शिवमने आपली बुलेट दामटली. त्यामुळे आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर तलवार, चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात जयस्वाल जबर जखमी झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. जखमी जयस्वालला रुग्णालयात नेण्यात आले. माहिती कळताच पोलीस तेथे पोहचले. जयस्वाल याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी पुलकित खोब्रागडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.यापूर्वीही झाल्या तक्रारीजयस्वाल आणि खोब्रागडे या दोघांमधील वादामुळे दोन्हींकडून एकमेकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या दोघांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांना समजही दिली होती. त्यांना कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी वाढला आणि ही प्राणघातक हल्ल्याची घटना घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर