जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST2021-07-21T04:07:15+5:302021-07-21T04:07:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जुन्या वादातून एका टोळक्याने इमामवाड्यातील एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. यात विक्की ऊर्फ विकास ...

Assault on a young man from an old argument | जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - जुन्या वादातून एका टोळक्याने इमामवाड्यातील एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. यात विक्की ऊर्फ विकास सतीश उके (वय ३२) नामक तरुण गंभीर जखमी झाला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जाटतरोडीच्या इंदिरानगरात ही घटना घडली.विक्की आणि त्याचा मित्र अश्विन अरुण गोसावी हे दोघे घरासमोर बोलत होते. तेवढ्यात तेथे आरोपी विजय मोहतम गोरखेडे, रिंकू रोनाल्ड लॉरेन्स, सोनू ऊर्फ चिरक्या नरेश मेश्राम तेथे आले. या तिघांनी जुन्या वादातून विक्की उकेवर चाकूने हल्ला चढवला. त्याच्या हातापायावर गंभीर जखमा झाल्या. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीच्या तावडीतून उकेला सोडवले. नंतर त्याने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींपैकी विजय गोरखेडेला अटक केली. त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Assault on a young man from an old argument