बार संचालकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:29+5:302021-01-03T04:10:29+5:30

नागपूर - दारूच्या बिलाचा वाद झाल्यानंतर दोघांनी एका बार संचालकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. बारमध्ये तोडफोडही केली. ...

Assault on bar operator | बार संचालकावर प्राणघातक हल्ला

बार संचालकावर प्राणघातक हल्ला

नागपूर - दारूच्या बिलाचा वाद झाल्यानंतर दोघांनी एका बार संचालकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. बारमध्ये तोडफोडही केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सदरमधील सुविधा बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली.

अर्पित भवानीशंकर चाैरसिया (वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री ९.१५ ला ते बारच्या काऊंटरवर बसून असताना आरोपी पिन्नी ऊर्फ हिमांशु कनोजिया (वय २५) त्याच्या एका साथीदारासह बारमध्ये आला. दारू पिल्यानंतर बिलावरून वाद घालून त्याने चाैरसिया यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. काऊंटरवर ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची तोडफोड केली. यामुळे बारमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर सदर पोलीस तेथे पोहचले. चाैरसियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Assault on bar operator