जावई मेव्हण्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:49+5:302021-01-03T04:10:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जुन्या वादातून मेव्हणा आणि नंतर जावयावर प्राणघातक हल्ला चढवून आरोपींनी पीडित व्यक्तीची दुचाकी पेटवून ...

Assassination of Jawai Mevhanya | जावई मेव्हण्यावर प्राणघातक हल्ला

जावई मेव्हण्यावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - जुन्या वादातून मेव्हणा आणि नंतर जावयावर प्राणघातक हल्ला चढवून आरोपींनी पीडित व्यक्तीची दुचाकी पेटवून दिली. शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

फिर्यादी राहुल विनायक वालदे (वय २६) हा डिप्टीसिग्नलमध्ये राहतो. त्याचा मेव्हणा संजय यादोराम सतोखिया सोबत आरोपी मोनू अण्णा, राहुल, टिपू आणि त्यांच्या साथीदारांचा जुना वाद आहे. शुक्रवारी रात्री संजय आणि आरोपी समोरासमोर आल्यानंतर आरोपींनी संजयला अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी कसेबसे निपटल्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. रात्री ८.३० च्या सुमारास राहुल रेल्वे लाईनजवळच्या एका दारूच्या दुकानाजवळ गेला. तेथे आरोपी राहुलच्या अंगावर धावून आले.त्यांच्या हातात तलवार, कोयता असे शस्त्र होते. आरोपीने राहुलवर तलवारीने वार केला. तो चुकवून राहुल जीवाच्या भीतीने तेथून पळून गेला. आरोपीने त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. नंतर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर दारू दुकानाचे गेट आणि भिंतीवर तलवार मारून ते तोडण्याचे प्रयत्न केले. या प्रकारामुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली. राहुलने या प्रकरणाची तक्रार कळमना ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

-----

Web Title: Assassination of Jawai Mevhanya