डांबराच्या ड्रमला आग लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:07+5:302021-03-14T04:09:07+5:30
वानाडोंगरी : हिंगणा ते मिहान रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराच्या दहा ते बारा ...

डांबराच्या ड्रमला आग लागली
वानाडोंगरी : हिंगणा ते मिहान रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराच्या दहा ते बारा ड्रमला अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी लगेच ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला.
रस्त्यावर काम करणारे मजूर दिड वाजताच्या सुमारास डांबर वितळविण्यासाठी आग लावतात. मात्र हे करीत असताना दहा ते बारा ड्रमला आग लागली. क्षणातच आगीचे लोळ हवेत दिसू लागले. घटनास्थळपासून लोकवस्ती जवळ असल्याने स्थानिकामध्ये खळबळ उडाली. येथील उमेश आंबटकर यांनी लागलीच हिंगणा पोलीस स्टेशनचे कमलेश ठाकरे यांना याबाबत माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जयदीप पवार, मल्हार डोईफोडे, कर्मचारी सोमेश वर्धे, मदणकर मेजर, कमलेश साहू यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक पेट्रोल पंपावरील अग्निशमन सिलिंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.