शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:29 IST

आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाºयांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदेवडिया भवनात घेतली शहर काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाऱ्यांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देवडिया काँग्रेस भवन येथे गुरुवारी शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. तीत कामगार नेते आ.भाई जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अनंतराव घारड, अ‍ॅड.अभिजित वंजारी, अभिजित सपकाळ, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, रामगोविंद खोब्रागडे, शेख हुसैन, नरेश गावंडे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, दीपक वानखेडे, विवेक निकोसे, प्रज्ञा बडवाईक, राजू व्यास, जयंत लुटे, संदेश सिंगलकर, बडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड.अक्षय समर्थ, मालिनी खोब्रागडे, वीणा बेलगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा विकास होत असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात औद्योगिक विकासात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता १३ व्या क्रमांकावर गेला आहे. नोटबंदीमुळे गुंतवणूक कमी झाली. व्यापाऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. झारखंड सारखे राज्य पुढे गेले. आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे. यावेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.आ. भाई जगताप यांनी शहर कॉग्रेसच्या तीन वर्षांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर शहर अध्यक्ष व शहर पदाधिकारी यांची प्रशंसा केली. असेच काम झाले तर आगामी निवडणूकांमध्ये कॉग्रेस यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. अ‍ॅड. रेखा बाराहाते, दर्शनी धवड, राजेश कुंभलकर, किशोर गीद, राजू व्यास यांनी संघटन बळकटीसाठी शहर काँग्रेसची भूमिका मांडली. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी तर आभार प्रदर्शन वीणा बेलगे यांनी केले.यशवंत बाजीराव काँग्रेसमध्येयावेळी भाजपाचे माजी आमदार यशवंत बाजीराव यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.मी काम करणाऱ्याच्या पाठिशीप्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, कुणी किती काम केले याचे मूल्यांकन होत आहे. आता बूथवर किती मिळाली हे शोधणारे अ‍ॅपही आले आहे. नागपूरमध्ये दोन मोठे मोर्चे यशस्वीपणे काढण्यात आले. मला सर्व माहीत आहे. माझे काम आवडो ना आवडो, परंतु जो करतो त्याच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या कामाला पावती दिली.ठाकरेंनी मांडला लेखाजोखायावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. शहर कॉग्रेस कमेटी पूर्णपणे क्रियाशील असून बूथ कमिटी,बूथ अध्यक्ष बनविण्याचे काम ब्लॉक अध्यक्षांमार्फत तसेच शहर कॉग्रेसचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण करुन एक मजबूत संघटन या शहरात तयार केले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा त्यांनी पुस्तक स्वरुपात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सादर केला.

 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण