श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक यावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST2021-06-23T04:06:51+5:302021-06-23T04:06:51+5:30

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या सुभाष रोड वरील श्रीगुरुदेव सेवामंडळ संस्थेच्या सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अशोक ...

Ashok came as the Chairman of Shri Gurudev Seva Mandal | श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक यावले

श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक यावले

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या सुभाष रोड वरील श्रीगुरुदेव सेवामंडळ संस्थेच्या सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अशोक यावले यांची निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी आजीवन प्रचारक रुपराव वाघ होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक यावले यांनी मागील पाच वर्षात सेवामंडळाच्या कार्याची माहिती दिली, तर सचिव विठ्ठलराव पुनसे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. २०१५ पासून कार्यरत असलेल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यामुळे २०२१-२५ या पाच या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड सर्व सहमतीने करण्यात आली. यात अध्यक्ष अशोक यावले, उपाध्यक्ष संगीता जावळे, कोषाध्यक्ष सात्विक ठवरे, सचिव विठ्ठलराव पुनसे, सहसचिव राजेश कुंभलकर, प्रचार प्रमुख सियाराम चावके, सह प्रचार प्रमुख रामदास टेकाडे यांची निवड करण्यात आली.

Web Title: Ashok came as the Chairman of Shri Gurudev Seva Mandal