अशोक बावाजीच्या जुगार अड्ड्यावर धाड

By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-13T00:45:23+5:302014-08-13T00:45:23+5:30

नागपूर-विदर्भातील सर्वात मोठा जुगार अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळच्या कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक यादव याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आज पहाटे धाड

Ashok Bawaji's gambling stands | अशोक बावाजीच्या जुगार अड्ड्यावर धाड

अशोक बावाजीच्या जुगार अड्ड्यावर धाड

सव्वासहा लाखांची रोकड जप्त : नगरसेवक, व्यापाऱ्यांसह २८ जुगारी जेरबंद
नागपूर : नागपूर-विदर्भातील सर्वात मोठा जुगार अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळच्या कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक यादव याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आज पहाटे धाड घातली. या धाडीत पोलिसांनी २८ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ६ लाख १२ हजारांची रोकड, २७ मोबाईलसह ७ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्त केला. परिमंडळ १ चे उपायुक्त अभिनाश कुमार आणि परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी एस. यांनी संयुक्तपणे ही छापामार कारवाई केली. जुगार अड्डा चालविणारा अशोक बावाजी मात्र आपल्या दोन साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी ठरला.
अशोक बावाजीचा जुगार अड्डा विदर्भातील जुगाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. इतवारी रेल्वे स्थानकाच्या जवळ भारतीय आखाड्याच्या परिसरात बावाजी गेल्या अनेक वर्षांपासून हा अड्डा चालवितो. येथे नागपूरच नव्हे तर दूरदूरचे जुगारी रोज रात्री जुगार खेळायला बसतात.
पोलीस उपायुक्त मोटरसायकलवर
लकडगंज तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांना बावाजी लाखो रुपये हप्ता देतो. त्यामुळे त्यांना या छाप्याची कल्पना द्यायची नाही, असे आधीच ठरविण्यात आले होते. त्यामुळे अभिनाश कुमार यांनी अंबाझरीचे ठाणेदार अनिल कातकडे यांच्यासह परिमंडळ १ मधील चार पोलीस ठाण्यातून १६ कर्मचारी सोबत घेतले. पोलीस उपायुक्त अभिनाश कुमारसह सर्व अधिकारी, कर्मचारी मोटरसायकलींनी साध्या वेशातच धडकले. बावाजीच्या अड्ड्यावर येण्या-जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. या तीनही मार्गावर बावाजीची माणसे रात्रंदिवस बसून असतात. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी तीनही मार्गावर बसलेल्या बावाजीच्या माणसांना जेरबंद करून नंतर आतमध्ये धडक दिली. पकडण्यात आलेल्यांमधील रमेश पुणेकर हा नगरसेवक आहे. यापूर्वीही पुणेकरला दोनवेळा वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर पकडण्यात आले होते.

Web Title: Ashok Bawaji's gambling stands