लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एनएसयूआय’च्या (नॅशनल स्टुडेन्ट्स युनियन आॅफ इंडिया) जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे हे निवडून आले आहेत. ५ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश ‘एनएसयूआय’च्या निवडणुका झाल्या होत्या. नागपूर विद्यापीठाच्या बुटी हॉलमध्य मतदानप्रक्रिया पार पडली होती. आशिष मंडपे हे गेल्या १० वर्षांपासून ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पाहत आहेत. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अभिषेक सिंग, राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून अमिर नुरी, प्रदेश सचिवपदी वैष्णवी भारद्वाज, नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी अनिरुद्ध पांडे, शादाब सोफी, सागर चौहान, मयूर पाचभावे, जिल्हा महासचिवपदी प्रतीक कोल्हे, नागेश गिऱ्हे, संकेत गमे, गुंजन ठाकूर, परमान अली, जिल्हा सचिवपदी अभिजित मेश्राम, शुभम वाघमारे, भूषण उईके हेदेखील निवडून आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश ‘एनएसयूआय’चे उपाध्यक्ष अजित सिंग यांनी दिली.
‘एनएसयूआय’च्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:33 IST
‘एनएसयूआय’च्या (नॅशनल स्टुडेन्ट्स युनियन आॅफ इंडिया) जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे हे निवडून आले आहेत.
‘एनएसयूआय’च्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे
ठळक मुद्दे १० वर्षांपासून ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय प्रतिनिधी