कल्याणमित्र बुद्धविहारात आषाढी पौर्णिमा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:18+5:302021-07-28T04:08:18+5:30
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून चिंधू बोरकर, रुस्तम मोटघरे, शुभा थुलकर, सुनीता गायकवाड, रमा देशभ्रतार, वनिता मोटघरे, गौतमी गायकवाड, सुनीता वासनिक, ...

कल्याणमित्र बुद्धविहारात आषाढी पौर्णिमा कार्यक्रम
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून चिंधू बोरकर, रुस्तम मोटघरे, शुभा थुलकर, सुनीता गायकवाड, रमा देशभ्रतार, वनिता मोटघरे, गौतमी गायकवाड, सुनीता वासनिक, कोमल वासनिक, मेंढे, राऊत, बागडे, अर्चना कडबे, आदी उपस्थित हाेते. सिद्धार्थ गाैतम यांनी आषाढी पाैर्णिमेच्या दिवशी त्यांचे राजेशाही जीवन त्यागले हाेते. त्यास महाभिनिष्क्रमण या नावाने ओळखले जाते. भगवान गाैतम बुद्धांनी आषाढी पाैर्णिमेला पहिला उपदेश दिला. त्यामुळे आषाढी पाैर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात केली जाते. त्यानंतरचे तीन महिने भिक्षू व उपासक बाैद्ध धर्माचा अभ्यास करतात. आकाशझेप फाउंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियानाच्या वतीने या बुद्धविहारात नियमित बुद्धवंदना व श्रमदान करणाऱ्यांना फळदान करण्यात आले. यशस्वितेसाठी डॉ. हेमशंकर वाघमारे, चंद्रभान गजभिये, विक्रांत नंदेश्वर, साक्षोधन कडबे यांनी सहकार्य केले.