लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशा वर्करच्या हक्कासाठी लढणाऱ्या सी.आय.टी.यू. (सीटू) संघटनेच्या स्थापनेचा शनिवारी ५० वा वर्धापन दिन होता. यानिमित्त आशा वर्करनी समान काम समान वेतन लागू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम व सचिव रंजना पौनीकर यांनी केले.आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी कामगारांना शासकीय कर्मचारी घोषित करा, समान काम -समान वेतन पद्धती लागू करा, एपीएल / बीपीएल अट रद्द करा, लॉकडाऊनदरम्यान सर्व कामगारांना किमान ७५०० रुपये महिना द्या, या मागण्यांचे फलक घेऊन आशा वर्करनी निदर्शने केली. आंदोलनात पौर्णिमा पाटील, अंजू चोपडे, रुपलता बोंबले, नासिर खान, अरुणा शेंडे, नंदा लिखार, लक्ष्मी कोटेजवार, मंजूषा फटिंग, रिया रेवतकर आदी उपस्थित होते. सीटूतर्फे जिल्ह्यातील ४८ ठिकाणी कार्यक्रम घेऊन सीटूच्या झेंड्याला मानवंदना देण्यात आली.
‘समान काम समान वेतन’ची आशा वर्करची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:43 IST
आशा वर्करच्या हक्कासाठी लढणाऱ्या सी.आय.टी.यू. (सीटू) संघटनेच्या स्थापनेचा शनिवारी ५० वा वर्धापन दिन होता. यानिमित्त आशा वर्करनी समान काम समान वेतन लागू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले.
‘समान काम समान वेतन’ची आशा वर्करची मागणी
ठळक मुद्देवर्धापन दिनानिमित्त आंदोलन