राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागपूरची आर्या कळमकर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 15:32 IST2019-07-27T15:32:02+5:302019-07-27T15:32:31+5:30
विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागपूरची आर्या कळमकर प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
अजनी येथील माऊंट कार्मेल शाळेत ८ वर्गात आर्या शिकत आहे. या स्पर्धेत देशातल्या विविध राज्यांतून आलेल्या स्पर्धकांमधून तिची निवड करण्यात आली आहे. पारितोषिक वितरण प्रसंगी नाट्यावली नृत्य अकादमीचे संस्थापक व दिग्दर्शक यु. महेशबाबू यांच्यासह अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. आर्याने नागपुरातील प्रतिभा नृत्य मंदिर येथे आपले नृत्य प्रशिक्षण घेत आहे.