अरविंद भोळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:07 IST2021-05-01T04:07:12+5:302021-05-01T04:07:12+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निलंबित पोलीस निरीक्षक अरविंद विनायक भोळे यांना बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर ...

Arvind Bhole's pre-arrest bail application rejected | अरविंद भोळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज

अरविंद भोळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निलंबित पोलीस निरीक्षक अरविंद विनायक भोळे यांना बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला, तसेच त्यांचा यासंदर्भातील अर्ज खारीज केला.

न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भोळे यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३७६, ४९३, ४१९, ४२०, ३२३, ५०६ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी भोळे यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना उच्च न्यायालयातही दणका बसला. फिर्यादी ४५ वर्षीय विधवा महिला असून, तिला एक मुलगा आहे. भोळे यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादीसोबत लग्न केले. त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच शारीरिकसंबंधांची छायाचित्रे काढली, अशी पोलीस तक्रार आहे. फिर्यादी महिलेतर्फे अ‍ॅड. प्रकाश नायडू यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Arvind Bhole's pre-arrest bail application rejected