शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

अरुण काकडे यांच्या निधनाने नागपुरातील रंगकर्मी हेलावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 11:03 PM

मराठी रंगभूमीसाठी सतत धडपडणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने हौशी, समांतर अशा प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्यांना धक्काच बसला.

ठळक मुद्देनाट्य चळवळीवर अपार प्रेम करणारा रंगकर्मीनागपुरातील नाटुकल्यांविषयी होती कमालीची आस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी रंगभूमीसाठी सतत धडपडणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने हौशी, समांतर अशा प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्यांना धक्काच बसला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापल्या गावामध्ये नाट्य चळवळ रुजविण्याचा प्रयत्न केला होता. अशा रंगकर्मीच्या अचानक जाण्याने अनेकांचे मन हेलावले आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नागपुरातही नाट्य चळवळ राबविली जाते, याचा त्यांना आनंद होता. त्याच कारणाने संजय भाकरे फाऊंडेशनच्या दरमहा एकांकिका चळवळीला भेट देऊन त्यांनी उपक्रमांची स्तुती केली होती. ‘आविष्कार’ ही संस्था उभारून त्यांनी अशाच प्रकारे नाट्य चळवळ सुरू केली आणि दुर्लक्षित नाटकांना व नटांना उभारी दिली होती. नागपुरातही अशा चळवळी सुरू आहेत, याबद्दल त्यांना कमालीची आस्था होती.दोन तासांच्या बैठकीत या माणसाने हृदयात जागा निर्माण केली - संजय भाकरेअरुण काकांच्या जाण्याने जणू आमच्या नाट्य चळवळीचा आधारच गेल्याची मनस्थिती आमची झाली आहे. आमच्या फाऊंडेशनला त्यांनी भेट दिली. आमची चळवळ बघून त्यांना कै. अरविंद आणि सुलभाताई देशपांडे यांचे स्मरण झाल्याचे ते म्हणाले होते. आता थांबायचे नाही, तर पुढे चालायचे. नटेश्वर मागे उभा असतोच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. केवळ दोन तासाच्या या बैठकीत त्यांनी माझ्या हृदयात अडिग अशी जागा निर्माण केल्याची भावना संजय भाकरे यांनी व्यक्त केली.प्रायोगिक रंगभूमीवरचा आधारस्तंभ हरवला - मदन गडकरीअरुण काकडे यांच्याशी माझा सततचा संवाद होता. ते आज गेले, याचा धक्काच बसला. प्रायोगिक रंगभूमीवरचे ते आघाडीचे रंगकर्मी होते. त्यांचे ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक १९८४-८५ साली झालेल्या नागपूर नाट्य संमेलनासाठी आणले होते. त्यावेळी ते स्वत:ही आले होते. छबिलदास नाट्य चळवळीतील त्यांनी अनेक नाटकांना व नटांना पुढे आणल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांनी सांगितले.रंगभूमीचा निष्ठावंत हरवला - नरेश गडेकरमराठी रंगभूमीवरचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी आपली भावना व्यक्त केली. अरुण काकडे यांनी कायम जमिनीवर राहून रंगभूमीची सेवा केली आहे. रंगकर्मींना नाट्यचळवळ म्हणून नाटकांची जाणीव करवून देण्यात, त्यांनी कमालीचे यश मिळविल्याचे गडेकर म्हणाले.रंगभूमीसाठीचे त्यांचे काम प्रेरणास्रोत - महेश रायपूरकररंगभूमीसाठीचे त्यांचे काम पुढच्या पिढीसाठी कायम प्रेरणास्रोत राहणार आहे. त्यांनी प्रायोगिक नाटकासाठी चालविलेली नाट्यचळवळ अनेकांना उभारी देणारी ठरली. त्यांच्यामुळे अनेक कलावंत पुढे आले आणि अनेक दुर्लक्षित नाटकांना वावही मिळाला. त्यांचे कामच पुढच्या पिढीसाठी शिदोरी ठरणार असल्याची भावना ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर यांनी व्यक्त केली.अरुणसारखा माणूस उभा करणे कठीण - रमेश अंभईकरअरुण काकडे हे काम करणारे आणि रंगकर्मी घडविणारा रंगकर्मी होता. एखादा कलावंत एकवेळ उभा करता येईल, पण अरुणसारखा काम करणारा माणूस पुन्हा उभे करणे कठीण आहे. त्याचे जाणे मनाला चटका देऊन गेल्याची भावना ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश अंभईकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :arun kakdeअरूण काकडेNatakनाटक