अरुण गवळी रजेसाठी हायकोर्टात

By Admin | Updated: February 4, 2016 02:46 IST2016-02-04T02:46:34+5:302016-02-04T02:46:34+5:30

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीने संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Arun Gawali resigns for the High Court | अरुण गवळी रजेसाठी हायकोर्टात

अरुण गवळी रजेसाठी हायकोर्टात

नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीने संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कारागृह प्रशासनाने त्याला रजा देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाला त्याने आव्हान दिले आहे. त्याच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. यापूर्वी नागपूर खंडपीठाने गवळीला मुलाच्या लग्नासाठी अभिवचन रजा (पॅरोल) दिली होती.
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली बाजू मांडणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Arun Gawali resigns for the High Court