शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

विणकरांच्या हातमागावरील कलाकृतींना मिळाले प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:36 IST

उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मोहाडी येथील ‘करवती मलबरी साडी’ तसेच ‘सिल्कच्या जाला घिसा साडी’ने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नागपूर-अमरावती विभागातून या स्पर्धेसाठी हातमागावरील विविध ३५ प्रकारच्या कापडावरील कलाकृती सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्दे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचा निकाल जाहीर : मोहाडीची ‘करवती मलबरी साडी‘ न ‘सिल्क जाला घिसा साडी’ प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मोहाडी येथील ‘करवती मलबरी साडी’ तसेच ‘सिल्कच्या जाला घिसा साडी’ने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नागपूर-अमरावती विभागातून या स्पर्धेसाठी हातमागावरील विविध ३५ प्रकारच्या कापडावरील कलाकृती सहभागी झाल्या होत्या.विणकरांनी तयार केलेल्या हातमागावरील कापडांच्या कलाकृतींना प्रोत्साहन मिळावे तसेच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी वस्त्रोद्योग विभागातर्फे विभागीय स्तरावर हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येतात. नागपूर व अमरावती विभागातील स्पर्धेसाठी विणकरांनी सादर केलेल्या कापडांची निवड महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली. प्रशासकीय इमारत क्रमांक दोन मधील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात विभागीय हातमाग कापड स्पधेर्तील विविध वस्त्रप्रकारांचे मान्यवरांच्या उपस्थितीत परीक्षण करून निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी आॅर्गनिक कापड, मलबरी खादी, टसर खादी, टसर मुंगा, करवती साडी, करवती टसर चौकडा साडी, रेशीम प्लेन जरी बॉर्डर साडी, सहा वार कॉटन साडी, कोसा प्लेन कापड, टसर सिल्क दुपट्टा, टसर टेबल नॅचरल क्लॉथ, मसराईज घिसा प्लेन कापड, चिंधी दरी , नॉयलॉन चिंधी दरी आदी वस्त्र प्रकार स्पर्धेसाठी आले होते.यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक यज्ञकुमार सूर्यवंशी, वस्त्रोद्योग शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख दीपक कुलकर्णी, वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक योगेशकुमार बाकरे, प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योगचे सहायक संचालक अनंता निनावे, सहसंचालक श्रीमती सरिता मुºहेकर, वस्त्रोद्योग विभागाच्या अश्विनी नदाफ, अरुणा बुराडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांकाचे २५ हजार रूपयांचे पारितोषिक दोन्ही कलाकारांना विभागून देण्यात आले. व्दितीय क्रमांकाचे २० हजार रूपयांचे पारितोषिक प्रविण मौंडेकर (नागपूर) यांना ‘कोसा पायल कापड’तर गंगाधर गोखले (आंधळगाव, भंडारा) यांना ‘टसर टेबल नॅचरल शर्टिंग कापड’ यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला. तृतीय क्रमांकाचे १५ हजार रूपयांचे पारितोषिक विभागून मोहम्मद कादीर महाजन(नागपूर)यांना ‘चिंधी कार्पेट’ यासाठी तर शालिक हेडावू (मोहाडी) यांना ‘मलबरी साडी’साठी जाहीर करण्यात आले. विभागातील विविध स्पर्धकांचे कापड यानंतर राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहे.हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता तसेच विणकरांनी उत्पादित केलेल्या कापडाला बाजारपेठेत वाव मिळावा म्हणून विभागीय हातमाग कापड स्पर्धा योजना १९७२ पासून सुरू करण्यात आली आहे. हातमाग कापड स्पर्धा विणकरांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांमध्ये निकोप स्पर्धा होऊन त्यांना योग्य बाजारपेठ आणि व्यासपीठ निर्माण व्हायला मदत होते, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगnagpurनागपूर