शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

कलावंतांनी कलेची साधना निरंतर करावी :राम सुतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 8:26 PM

कला कुठलीही असो, कलावंतांनी जर तिची साधना निरंतर केल्यास, ती कला तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. चित्रकलेच्या बाबतीतही चित्रकाराने सातत्य ठेवल्यास एक अशी वेळ येते, जेव्हा त्याच्या एका स्ट्रोकमधूनही उत्कृष्ट पेंटिंग उभे राहते, असा मार्गदर्शनपर सल्ला प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री, पद्मविभूषण राम सुतार यांनी युवा कलावंतांना दिला.

ठळक मुद्देचौथ्या लॅण्डस्केप प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कला कुठलीही असो, कलावंतांनी जर तिची साधना निरंतर केल्यास, ती कला तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. चित्रकलेच्या बाबतीतही चित्रकाराने सातत्य ठेवल्यास एक अशी वेळ येते, जेव्हा त्याच्या एका स्ट्रोकमधूनही उत्कृष्ट पेंटिंग उभे राहते, असा मार्गदर्शनपर सल्ला प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री, पद्मविभूषण राम सुतार यांनी युवा कलावंतांना दिला.जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे चौथ्या लॅण्डस्केप पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत करण्यात आले आहे. सोमवारी प्रदर्शनाचे उद्घाटन राम सुतार यांच्याहस्ते झाले. यावेळी लोकमत एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट व शिल्पकार अनिल सुतार, उद्योगपती किरीट भंसाली व प्रसिद्ध निसर्गचित्रकार हेमंत मोहड उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे कुवांरा भिवसेने येथे पेंटिंगचे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात वॉटर कलरमध्ये उत्कृष्ट लॅण्डस्केप तयार करणाऱ्या कलावंतांच्या पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनात लावण्यात आलेल्या पेंटिंगमध्ये कलावंतांनी निसर्ग, ग्रामीण जीवन, पुरातन मंदिर, ओढे, टेकड्या, तळ्याचा काठ, सूर्योदयाच्या छटा, ग्रामीणमधील बाजारहाट साकारला आहे. राम सुतार यांनी या सर्व पेंटिंगचे अवलोकन करून, कलावंतांच्या कुंचल्यातून वॉटर कलरचा प्रवाह हा निरंतर वाहत रहावा, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अनिल सुतार म्हणाले की, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी नवीन कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे.यावेळी उत्कृष्ट पेंटिंग साकारणाऱ्या कलावंतांना पुरस्कृत करण्यात आले. यात प्रशांत चिरकुटे, श्रीपाद भोंगाडे, राजू भूईकर, सुबोध कथळे, पुलकित मिरासे, रोशन इंगोले, नंदकिशोर साळवकर, स्वप्निल शिऊरकर, सुमित्र ब्राम्हणकर यांचा समावेश आहे. तसेच यावेळी विजय काकडे, हेमंत मोहोड, प्रफुल्ल तायवाडे, विजय अनिसकर, प्रवीण ढेंगे, गोविंद परांडे, नीलेश भारती, रणजित वर्मा या वरिष्ठ कलावंताचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अमित गोनाडे यांनी केले.कलाक्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नकोविदर्भ असो की महाराष्ट्र या भूमीने दर्जेदार कलावंत दिले आहेत. तरीपण कलाक्षेत्रात एक पातळी गाठण्यासाठी महाराष्ट्रातील कलावंतांना संघर्ष करावा लागतो आहे. कारण कलेच्या क्षेत्रातही राजकीय हस्तक्षेप आहे. या क्षेत्राने राजकीय हस्तक्षेपातून बाहेर पडणे गरजेचे आहे, असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :artकलाJawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी