कलात्मक ड्रायफ्रूटचे गिफ्ट बॉक्स
By Admin | Updated: October 19, 2014 00:58 IST2014-10-19T00:58:30+5:302014-10-19T00:58:30+5:30
देशात सर्वकाही आधुनिक होत असताना भेटवस्तू देणेही ‘हायटेक’ झाले आहे. दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची वाढती मागणी पाहता

कलात्मक ड्रायफ्रूटचे गिफ्ट बॉक्स
भेटवस्तूंची पद्धत हायटेक : लोकांची मागणी वाढली
नागपूर : देशात सर्वकाही आधुनिक होत असताना भेटवस्तू देणेही ‘हायटेक’ झाले आहे. दिवाळीत शुभेच्छा देताना भेटस्वरूपात ड्रायफ्रूट देण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची वाढती मागणी पाहता बाजारात उपलब्ध कलात्मक ड्रायफ्रूट गिफ्ट बॉक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नात्यांमध्ये गोडवा
कोटेचा यांनी सांगितले की, ४० प्रकारचे कलात्मक बॉक्सेस पुणे, जोतपूर आणि बेंगळुरू येथून येतात. त्यात पॅकिंग केली जाते. हे बॉक्सेस आकर्षक असल्याने खाली झाल्यानंतर फे्रमच्या स्वरूपात वापर करता येतो. हे बॉक्सेस नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचे एक माध्यम आहे. शहरात सर्वप्रथम महावीर मेवावालाने हाताने तयार केलेल्या आकर्षक कलात्मक गिफ्ट पॅकेटची सुरुवात केली आहे. आज संपूर्ण शहरात याचा वापर केला जातो. गेल्यावर्षी बैलगाडी, घड्याळ, वॅटचे गिफ्ट बॉक्सेस हे आकर्षणाचे केंद्र आहे.
आता भेटस्वरूपात ड्रायफ्रूट
लोकांची गरज पाहता मध्य भारतात प्रसिद्ध महावीर मेवावाला फर्मने विविध आकार आणि आकर्षक डिझाईनमध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूटचे बॉक्सेस आणले आहेत. पाहताक्षणीच खरेदीची इच्छा होईल, असे आहेत. किफायत दरामुळे सर्वसामान्यांनाही भेट देणे शक्य होते. महावीर मेवावालाचे संचालक अॅड. अरुण कोटेचा यांनी सांगितले की, दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा पर्व आहे.
हा सण एकत्रितरीत्या साजरा केला जातो. या दिवसात एकमेकांना आकर्षक भेट देऊन शुभेच्छा देतात. या सणाचे स्वरूप हायटेक झाल्याने भेटस्वरूपात ड्रायफ्रूटचे आकर्षक पॅकिंगचे गिफ्ट बॉक्स देण्याची पद्धत गेल्या ७ ते ८ वर्षांत वाढली आहे. मिठाई जास्त दिवस फे्रश राहत नाही, हे त्याचे मुख्य कारण आहे. ड्रायफ्रूट ८ ते ९ महिने फ्रेश राहतात. कार्पोरेट कंपन्यांसह अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे बॉक्सेस एकमेकांना भेट देतात.(प्रतिनिधी)
दरवेळी नवा प्रयोग
बॉक्सेस आकर्षक दिसण्यासाठी आणि ग्राहकांना काही वेगळे मिळावे, या उद्देशाने प्रत्येकदा नवनवीन प्रयोग केले जातात. सध्या याची मागणी वाढली आहे. विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील खरेदीदार येतात. बॉक्सेसमध्ये काजू, किसमिस, बादाम, पिश्ता, अंजीर, जरदाळू आणि अन्य ड्रायफ्रूट पॅक केले जातात. ते ग्राहकांसाठी किफायत दरात उपलब्ध आहेत. बॉक्सची रेंज ३११ रुपयांपासून ३,५०० रुपयांपर्यंत आहे. ड्रायफ्रूटच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो.
काजू कतलीची मागणी वाढली
गेल्या काही वर्षात काजू कतलीची मागणी वाढली आहे. संचालकांनी सांगितले की, आम्ही केवळ कतलीचे उत्पादन करतो. काजू कतलीला संपूर्ण विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अनेक शहरांमधून मागणी असते. महावीर मेवावाला हे प्रतिष्ठान जागनाथ रोड, गांधीबाग आणि धरमपेठ मेन रोड तसेच पंचशील सिनेमा बिल्डिंग, वर्धा रोड येथे आहे.