'चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:55 IST2020-11-27T00:54:47+5:302020-11-27T00:55:57+5:30
fraud case, crime news दुकान मालकाने दिलेला चॉकलेटचा माल तसेच रक्कम गिळंकृत करू पाहणाऱ्या नोकराला जरीपटका पोलिसांनी अटक केली.

'चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुकान मालकाने दिलेला चॉकलेटचा माल तसेच रक्कम गिळंकृत करू पाहणाऱ्या नोकराला जरीपटका पोलिसांनी अटक केली. सुबोध संजय वाशिमकर (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. तो पाचपावलीच्या लष्करीबाग परिसरात राहतो.
जरीपटका येथील दिलीप अमरलाल मायारमानी यांनी त्याला १९ नोव्हेंबरला स्वतःचे दुचाकी वाहन तसेच चॉकलेटचा माल आणि रोख १७ हजार रुपये वेगवेगळ्या ग्राहकांकडे पोहचवण्यासाठी दिले. आरोपी सुबोधने चॉकलेट दुकानदाराला पोहोचवले. तेथून रक्कम घेतली. ती आणि फिर्यादी मायारमानी यांनी दिलेली १७ हजारांची रोकड तसेच दुचाकी घेऊन पळून गेला. मायारमानी यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ हजार रुपये आणि ६० हजारांची दुचाकी असा ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.