मेडिकलच्या डॉक्टरांना मारहाण करणारे गजाआड : सराईत गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 09:07 PM2021-05-11T21:07:01+5:302021-05-11T21:12:52+5:30

Arrested who beat up medical doctors मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली.

Arrested who beat up medical doctors: Hardcore Criminals | मेडिकलच्या डॉक्टरांना मारहाण करणारे गजाआड : सराईत गुन्हेगार

मेडिकलच्या डॉक्टरांना मारहाण करणारे गजाआड : सराईत गुन्हेगार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली. नागेश साहेबराव पवार (वय ३२, रा. फ्रेंड्स कॉलनी) आणि माधव ऊर्फ राजकुमार सुभाष बाबलसरे (वय ३६, रा. आदिवासी सोसायटी, मनीष नगर अशी या भामट्यांची नावे आहेत.

रमजानचे रोजे ठेवून रुग्णसेवा देणारे दोन निवासी डॉक्टर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान फळे विकत घेण्यासाठी मेडिकल चौकात आले होते. हातठेल्यावरील फळे विकत घेऊन दुचाकीवर बसत असताना एका इसमाला चुकून एकाचा पाय लागला. त्यामुळे डॉक्टरांनी माफीसुद्धा मागितली. परंतु आरोपींनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एकाने दुचाकीची चावी काढली. डॉक्टरांनी स्वत:ची ओळख देत उपवास सुरू असल्याचे सांगितले. परंतु आरोपींनी डॉक्टरांना मारहाण केली. डॉक्टरांना मारहाण होत असल्याचे पाहून आजूबाजूची मंडळी जमा होताच मारहाण करणारे ‘एमएच ३१/ डीसी ५६३३’ क्रमांकाच्या इंडिगो कारमधून पळून गेले. याची माहिती इतर निवासी डॉक्टरांना मिळताच मेडिकलचे १००वर डॉक्टर मेडिकल चौकात जमा झाले. जखमी डॉक्टरांना मेडिकलच्या कॅज्युअल्टीत दाखल करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांच्या नेतृत्वात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी कारच्या नंबरच्या आधारे आरोपी पवार आणि बाबलसरे या दोघांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले. पवार हा बॅटरीचे दुकान चालवतो. तर बाबलसरे प्रॉपर्टी डीलर आहे. त्याच्यावर बेलतरोडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कस्टडीत पाठवण्याचे आदेश दिले.

Web Title: Arrested who beat up medical doctors: Hardcore Criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.