साेशल मीडियावर अश्लील फाेटाे अपलाेड करणारा आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST2020-12-17T04:36:59+5:302020-12-17T04:36:59+5:30

वेलतूर : साेशल मीडियावरील आयडी हॅक करून अश्लील फाेटाे अपलाेड करणाऱ्या आराेपीस वेलतूर पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई साेमवारी ...

Arrested for uploading obscene videos on social media | साेशल मीडियावर अश्लील फाेटाे अपलाेड करणारा आराेपी अटकेत

साेशल मीडियावर अश्लील फाेटाे अपलाेड करणारा आराेपी अटकेत

वेलतूर : साेशल मीडियावरील आयडी हॅक करून अश्लील फाेटाे अपलाेड करणाऱ्या आराेपीस वेलतूर पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई साेमवारी (दि.१४) रात्री ११ वाजताच्या सुमारास चिकना येथे करण्यात आली.

प्रशिक राजहंस माेटघरे (२६, रा. चिकना, ता. कुही) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने साेशल मीडियावरील फिर्यादीची प्राेफाईल आयडी हॅक करून त्यावर अश्लील फाेटाे अपलाेड केले. शिवाय, आराेपीने ते फाेटाे फिर्यादीच्या मित्रांना पाठविले. ही बाब लक्षात येताच फिर्यादीने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी फिर्यादी तुळसीदास रामकृष्ण कळंबे (४१, रा. चिकना) यांच्या तक्रारीवरून वेलतूर पाेलिसांनी भादंवि कलम ५०७, सहकलम ६६ (सी) ६७ आयटी ॲक्ट नुसार गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत मदने करीत आहेत.

Web Title: Arrested for uploading obscene videos on social media