मित्रांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:45+5:302021-03-13T04:12:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी ...

मित्रांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी घरी जाताच एकाने त्या भाजीत विषारी द्रव्य मिसळविले. ही बाब लक्षात येताच सर्व जण जेवण न करता निघून गेले. मात्र, ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच प्रकरण पाेलिसात पाेहाेचले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलापूर (ता. नरखेड) शिवारात २५ डिसेंबर २०१३ राेजी घडली असून, पाेलिसांनी पसार झालेल्या आराेपीस सात वर्षांनी अर्थात बुधवारी (दि. १०) नागपूर शहरातून अटक केली.
नीलेश धनराज नारनवरे (३२, रा. पिलापूर, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नीलेशचा हरविलेला माेबाईल देवीदास महादेव नारनवरे, रा. पिलापूर याला सापडल्याने ताे परत देण्यासाठी देवीदास व अन्य तीन मित्रांनी नीलेशला पार्टी मागितली हाेती. नीलेशने हाेकार दिल्याने २५ डिसेंबर २०१३ च्या रात्री पिलापूर शिवारातील दिदावत यांच्या शेतात मटनाची पार्टी आयाेजित केली हाेती.
भाजी तयार केल्यानंतर नीलेश शेतात थांबला तर अन्य चाैघे पाेळ्या आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते परत आले असता, त्यांना नीलेश भाजीत काहीतरी मिसळत असल्याचे चाैघांच्याही निदर्शनास आले. त्यांनी विचारणा करताच नीलेश तिथून पळून गेला. त्यामुळे चाैघांनी जेवण न करता ती भाजी फेकून दिली. दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर २०१३) ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे देवीदास नारनवरे याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३२८, ३०७, १२० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.
...
नागपुरातून घेतले ताब्यात
आराेपी नीलेशला अटक करण्यासाठी पाेलीस प्रशासनाने ‘फरार आरोपी पाहिजेत’ या अभियानांतर्गत राेख बक्षीस जाहीर केले हाेते. दरम्यान, ताे नागपूर शहरातील अवस्थीनगर, सादिकाबाद भागात असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना मिळाली हाेती. नरखेड पाेलिसांच्या पथकाने या भागात सापळा रचून आराेपी नीलेशला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या पथकात हरिश्चंद्र गावडे यांच्यासह मनीष सोनोने, कैलास उईके, दिगांबर राठोड, राजकुमार सातुर व नीतेश पुसाम या पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. हे सर्व जण राेख बक्षिसाचे मानकरी ठरले.