अवैध शस्त्र बाळगणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:09 IST2021-01-18T04:09:08+5:302021-01-18T04:09:08+5:30

खापरखेडा : चाकूचा धाक दाखवून पैसे न देता कपडे खरेदी करणाऱ्या व्यक्तीला खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ...

Arrested in possession of illegal weapon | अवैध शस्त्र बाळगणारा अटकेत

अवैध शस्त्र बाळगणारा अटकेत

खापरखेडा : चाकूचा धाक दाखवून पैसे न देता कपडे खरेदी करणाऱ्या व्यक्तीला खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून खरेदी केलेले कपडे व चाकू जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

शैलेश सुरेश मसराम (३५, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. फिराेज मुस्ताक सिद्दीकी (३५, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) यांचे दहेगाव (रंगारी) येथे कपड्यांचे दुकान आहे. शैलेशने त्यांच्या दुकानातून २,१०० रुपये किमतीचे कपडे खरेदी केले. दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून, पैसे न देता तो कपडे घेऊन गेला, शिवाय कुख्यात सूरज कावळे याचा साथीदार असल्याचेही त्याने दुकानदाराला सांगितले हाेते. त्यामुळे फिराेज यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंविचे कलम ३८४, आम्स ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून शैलेशला अटक केली. त्याच्याकडून २,१०० रुपयांचे कपडे व चाकू जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार गुरुप्रकाश मेश्राम करीत आहेत.

Web Title: Arrested in possession of illegal weapon